Type Here to Get Search Results !

लालची राजा

 


लालची राजा 


खूप खूप वर्षा पूर्वी मिडास नावाचा एक राजा होता . त्याला एक मुलगी होती.त्याची प्रजा खूप दुःखी होती कारण त्याला सोन्याचा फार हव्यास होता . सोने मिळवण्यासाठी काय वाटेल ते करायला तो तयार होता. आपल्या प्रजाजनांचीही लूट करून तो त्यांच्याकडून सोने हिरावून घेत असे .

 एक दिवस अचानक त्याला देवाचे दर्शन झाले . देवाने त्याला सांगितले , “ तू सोन्याचा हव्यास सोडून दे . त्याने तू ही दुःखी होशील आणि तुझी प्रजाही दुःखी होईल . " पण मिडासने हे ऐकले नाही . तो देवाला , म्हणाला, " मला असे वरदान दे कि मी ज्या वस्तूला स्पर्श करेन ती सोन्याची होईल . " देवाने पुन्हा पुन्हा राजाला धोक्याचा इशारा दिला. पण राजाचा हट्ट कायम होता . तेव्हा देवाने तसा वर मिडासला दिला व तो अदृष्य झाला.

 दिवसभर मिडास राजा घरातल्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करून सोने बनवण्यात मग्न होता . त्याला तहान भुकेचीही आठवण राहिली नाही . शेवटी राणीने खूप आग्रह करून त्याला जेवायला बसवले . पण त्याला जेवताच येईना. तो ज्या पदार्थाला स्पर्श करी , तो सोन्याचा होई . खाणार काय अशी परिस्थिती झाली राजाची?

त्याची राणी व राजकन्या त्याच्याजवळ आल्या . पण मिडासने स्पर्श केल्याबरोबर त्यांचेही रूपांतर सोन्याच्या पुतळ्यात झाले . आता मात्र मिडासला पूर्ण कल्पना आली कि हा वर किती भयंकर आहे . भुकेने आणि प्रियजनांच्या विरहाच्या दुःखाने तो वेडापिसा होऊन गेला . त्याला पश्चाताप झाला . पण त्याचा आता काय उपयोग होता ? शेवटी त्याने पुन्हा देवाची आराधना केली.देव पुन्हा आला आणि राजाने देवाची माफी मागीतिली.देवाने सर्व पूर्ववत केले.आता राजा सोन्याचा विचार ही करत नाही.

तात्पर्य : अतिहव्यास हा विनाशालाच निमंत्रण देतो . त्यामुळे जे मिळेल त्यात सुखी राहावे. जास्तीची अपेक्षा विनाशच करते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.